संत ज्ञानेश्वर महाराजांची माहिती, निबंध व अभंग Sant Dnyaneshwar Information in Marathi
संत ज्ञानेश्वर (Sant Dnyaneshwar Information in Marathi): संत ज्ञानेश्वर (Sant Dnyaneshwar) हे महाराष्ट्राच्या महान संतांपैकी एक होते. ते महाराष्ट्रातील एक थोर योगी, तत्त्वज्ञानी आणि संतकवी होते. भागवत तथा वारकरी संप्रदायाचे तत्त्वज्ञ प्रवर्तक. अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जाणारा ज्ञानमार्ग त्यांनी सर्वसामान्यांना दाखवला. त्यांनी योगसामर्थ्याने आपले प्रभुत्व सिद्ध केले. आध्यात्मिक समतेवर आधारलेल्या वारकरी संप्रदायाची सुरुवात केली. आणि वारकरी संप्रदायाला जन्म देणारे ज्ञानदेव सर्व संतांची माउली झाले. आजही ज्ञानेश्वरांची पालखी खांद्यावर घेऊन संत मोठ्या भक्तिभावाने ज्ञानेश्वर माउलीच्या नावाचा गजर करत नामसंकीर्तनात दंग होऊन पंढपूरला जातात.
संत ज्ञानेश्वर महाराजांची माहिती, निबंध व अभंग Sant Dnyaneshwar Information in Marathi
तेराव्या शतकात आपेगाव येथे, श्रावण कृष्ण अष्टमी, शके 1197 (इ.स 1275) रोजी (Sant Dnyaneshwar born on) ज्ञानेश्वरांचा जन्म झाला. विठ्ठलपंत कुलकर्णी (father of Sant Dnyaneshwar) हे त्यांचे वडिल तर रुक्मिणीबाई (mother of Sant Dnyaneshwar) हे आईचे नाव होते. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील आपेगाव (Birth place of Sant Dnyaneshwar) हे त्यांचे जन्मगाव, पैठणजवळ गोदावरी नदीच्या काठावर वसलेले आहे.
संत ज्ञानेश्वर महाराजांचे वडील विठ्ठलपंत हे संस्कृत अभ्यासक आणि धार्मिक मनाचे होते. विठ्ठलपंत ते नंतर गाव लेखापाल होते. ते मुळात विरक्त्त संन्यासी होते. त्यांनी विवाहित असतानाच संन्यास घेतला आणि ते काशीला गेले. ते विवाहित असल्याचे गुरूंना समजले. म्हणून गुरूंनी त्यांना घरी परत पाठवले. विठ्ठलपंतांनी त्यांच्या आज्ञेनुसार पुन्हा गृहस्थाश्रम स्वीकारला.
विठ्ठलपंत व रुक्मिणीबाईंना चार अपत्ये झाली. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान व मुक्ताबाई अशी त्यांची नावे.(Siblings of Sant Dnyaneshwar) लहान वयातच वडिलांकडून चारही भावडांना ब्रह्मविद्येचे बाळकडू मिळाले. त्याचबरोबर आईकडून चांगले संस्कार मिळाले.